कोकणची किमयागर- कोकण रेलवे
कोंकण रेल्वे भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर असणारा रेल्वेमार्ग म्हणजे खरोखरच एक अद्भुत आणि जणू चमत्कारच आहे. अत्यंत कठीण नैसर्गिक परिस्थितिंचा सामना करुन हां रेल्वेमार्ग बांधण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथुन सुरु होणारा हां मार्ग कर्णाटकातील ठोकूर येथे संपतो. ह्या मार्गात एकुण ९१ बोगदे, २००० छोटे-मोठे पुल आणि स्थानके अाहेत. पावसाळ्यात ह्या मार्गातून प्रवास करण्याची मजा औरच असते.२६ जानेवारी १९९९ साली सुरु झालेल्या मार्गाने दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांचे ८ तास वाचवलेच शिवाय हयामुळे कोकणातील माणसाला रोजगार देखील मिळवून दिला. पूर्वी फक्त रस्ते वाहतुकीने जोडले गेलेले कोंकण आता रेल्वेमार्गाने साऱ्या देशाशी जोडले गेले.
१९७० साली ह्या मार्गाचे सर्वेक्षण सुरु झाले.१९७१ ते १९७५ दरम्यान दासगाव(रोहा) ते रत्नागिरी दरम्यानचे अत्यंत कठोर निरिक्षण केले गेले.१९८८ साली मंत्रालयात कोकण रेलवे चा रिपोर्ट प्रकाशित केला गेला.१९७७ साली जेव्हा प्रो.मधु दंडवते रेल्वेमंत्री होते तेव्हा हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचे काम सुरु झाले. त्यानंतर जेव्हा १९८९ साली जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाले तेव्हा कोंकण रेल्वेच्या कामास अत्यंत वेग प्राप्त झाला. त्यांनी आपल्या कामाच्या पहिल्याच दिवशी सांगितले होते, माझ्या कार्यकाळात मला दोन प्रकल्प पुर्ण करायचे आहेत, एक बाघा-चित्तौनी(बिहार) दुसरी कोंकण रेलवे! मार्गासाठी पैसा उभे करणे हे अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच कठीण काम होते.मधु दंडवते ह्यांनी पण केंद्रीय वित्तमंत्री नात्यानी आर्थिक बाबतीत पुर्ण सहयोग केला. ई.श्रीधरन हे त्यावेळेस रेलवे बोर्डातील एक अनुभवी इंजीनियर होते. ते मार्गाबाबत अत्यंत उत्साही होते. अत्यंत कठिन असा रेल्वेमार्ग व्हावा हे त्यांचे स्वप्न होते.सगळ्या कागदी मान्यता मिळवायला १९८९ साल पुर्ण गेले अखेरीस १९ जुलै १९९० रोजी कोंकण रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड ची स्थापना झाली. १५ सप्टेंबर १९९० रोजी रोहा येथे शरद पवारांच्या हस्ते मार्गाचे भूमिपूजन झाले. त्यावेळेस त्यांच्यासमोर अनेक नैसर्गिक समस्या होत्या जसे रोहा ते मंगलोर मधील अत्यंत दुर्गम भागात जाऊन तेथे ७६० किमी चा रेल्वेमार्ग उभारणे.कोंकण रेलवे ला फ़क्त ५ वर्षांचा अवधी देण्यात आला. कार्यकाल अत्यंत कमी होता. सर्वप्रथम ७६० किमी च्या मार्गाचे ७ भागात विभाजन करण्यात आले.प्रत्येक भाग १०० किमी चा होता. ते होते, महाड ,रत्नागिरी(उत्तर),रत्नागि री(दक्षिण),कुडाळ,मडगाव,कारवार, उडुपि.
नैसर्गिक आव्हाने -कोकण रेलवे चा मार्ग बांधताना इंजीनियर्स समोर अनंत नैसर्गिक आव्हाने होती.निसर्ग प्रत्येक ठिकाणी नवनवीन आव्हाने घेऊन मार्गात अडथळा आणत होता.अतिप्रचंड असा सह्याद्री खणून काढायचा होता.डोंगरातला दगड सुद्धा कापण्यास अत्यंत कठीण! कामगाराना अश्या ठिकाणी काम करायचे होते जिथे अत्यंत विषारी साप,खोल दरयाखोरी होती. जवळपास १५०० छोट्या-मोठ्या नद्यांवर पुल बांधायचे होते. डोंगर फोडून त्यातून रेल्वेमार्ग काढायचा होता.१९९४ साली महाडला जेव्हा पुराचा तडाखा बसला तेव्हा कोकण रेलवे सुद्धा बचावली नाही. बोगद्यात पुर्ण पुराचे पाणी भरले होते. सगळ्या मशीन्स वर ६-७इंच चिखल साठला होता. १९९७ साली पावसाळ्यात उक्षी येथे आक्खा डोंगरच वाहून आला होता. पण त्यातून जवळपास २०० कामगार अश्चार्यकारक रित्या बचावले होते. १० ऑक्टोबर १९९७ रोजी पेरनेम बोगद्याचे काम करताना इंजीनियर्स वर डोंगराचा कोसळला होता.अशा आणि असंख्य प्रतिकूल परिस्थितीवर मात करत २६ जानेवारी १९९८ रोजी हां मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कोंकण रेलवे ने ईंधन बचत आणि सामान वाहतूक ह्यांची वाहतुक ह्यांचा समन्वय साधत रो-रो सेवा केली आहे. ज्यात देशाच्या दक्षिण भागातून भागात सामानची वाहतूक अत्यंत सुरक्षित रित्या केलि जाते. सामानाने भरलेले ट्रक एका मालगाडीवर चढवले जातात आणि ती मालगाड़ी त्यांची वाहतूक करुन ईंधन बचत होते. कर्नाटकातील सुरकाथल, गोव्यातील वेरना महाराष्ट्रातील कोलाड येथे मालगाडीवर ट्रक चढवण्याची सुविधा आहे.
कोंकण रेल्वे वरील काही उल्लेखनीय गोष्टी
एकूण स्थानके- 64
एकूण स्थानके- 64
एकूण पुल- १९९८
लहान पुल-१८१९
मोठे पुल-१७९
सर्वात लांब पुल- होन्नावर पुल,शरावती नदी, होन्नावर-कर्नाटक-२०६५.५ मीटर (६७७८ फुट)
सर्वात उंच दरीपुल(Viaduct)- पानवल नदी दरीपुल (६४ मीटर उंच) देशातील सर्वात उंच आणि आशियातील तिसऱ्या क्रमांकाचा उंच दरीपुल.
एकुण बोगदे- ९१
सर्वात मोठा बोगदा- १. करबुडे बोगदा ,रत्नागिरी( ६.५ किलोमीटर) भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लांबीने मोठा बोगदा२. टिके बोगदा ,रत्नागिरी (४ किलोमीटर)
३. नातुवाडी बोगदा ,दिवानख़वटी(४ किलोमीटर)
४. बेर्डेवाडी बोगदा,आडवली
महत्त्वाच्या एक्सप्रेस
१२०५१/५२ दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस
१०१११/१२ छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगाव कोंकणकन्या एक्सप्रेस
१०१०३/०४ छत्रपती शिवाजी टर्मिनस-मडगाव मांडवी एक्सप्रेस
१२६१७-१८ हजरत निजामुद्दीन-एर्णाकुलम मंगला लक्षद्वीप सुपरफास्ट एक्सप्रेस.
१२६१९/२० लोकमान्य तिलक टर्मिनस-मंगलोर सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस
१६३४५/४६ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
१२१३३/३४ छत्रपती शिवाजी टर्मिनस-मंगलोर जंक्शन सुपरफास्ट एक्सप्रेस.
११००३/०४ दादर-सावंतवाड़ी राज्यराणी एक्सप्रेस
११०८५/८६ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव डबलडेकर एक्सप्रेस
१२२०१/०२ लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली गरीबरथ एक्सप्रेस
१२२२४/२५ लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्णाकुलम दुरंतो एक्सप्रेस
१२२८३/८४ हजरत निजामुद्दीन-एर्णाकुलम दुरंतो एक्सप्रेस
१२४३१/३२ हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस
२२४१३/१४ हजरत निजामुद्दीन-मडगाव गोवा राजधानी एक्सप्रेस
२२१४९/५० पुणे-एर्णाकुलम पूर्णा एक्सप्रेस(पनवेल मार्गे)
५०१०१/०२ रत्नागिरी-मडगाव पैसेंजर
५०१०३/०४ दादर-रत्नागिरी पैसेंजर
५०१०५/०६ दिवा-सावंतवाड़ी पैसेंजर
कोंकण रेलवे वरील स्थानके -
1.रोहा
2.कोलाड
3.इंदापूर
4.माणगाव
5.गोरेगाव
6.वीर
7.सापे
8.करंजाड़ी
9.विन्हेरे
10.दिवानख़वटी
11.खेड
12.अंजनी
13.चिपळूण
14.कामते
15.सावर्डे
16.अरावली
17.संगमेश्वर
18.उक्षी
19.भोके
20.रत्नागिरी
21.निवसर
22.आडवली
23.विलवडे
24.राजापुर
25.वैभववाड़ी
26.नांदगांव
27.कणकवली
28.सिंधुदुर्ग
29.कुडाळ
30.झारप
31.सावंतवाड़ी
32.मदुरे
33.पेरनेम
34.थिवीम
35.करमाली
36.वेरना
37.माजोर्डा
38.मडगाव
39.बाली
40.केनकोना
41.लोलेम
42.असनोटि
43.कारवार
44.हरवाड़ा
45.अंकोला
46.गोकर्ण
47.कुमटा
48.होनावर
49.मानकी
50.मुरुडेश्वर
51.चित्रपुर
52.भाटकळ
53.शिरूर
54.मुम्बारिका रोड
55.बिजुर
56.सेनपुरा
57.कुंडापुरा
58.बारकुर
59.उडुपी
60.पद्दुबिदरी
61.नांदीकुर
62.मुलकी
63.सुरकाथल
64.ठोकूर
उक्षी रेल्वे स्थानक,रत्नागिरी
कोंकण रेलवे ची हद्द सुरु असणारा फलक,रोहा-महाराष्ट्र
५०१०५ दिवा-सावंतवाड़ी पैसेंजर खेड स्थानकात उभी असताना
पोमेंडी बोगद्यातून रेलवे बाहर येताना
रानपट धबधबा, रत्नागिरी
५०१०६ सावंतवाड़ी-दिवा पैसेंजर निवसर स्थानकातून निघताना
१२४३१ त्रिवेन्द्रम-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस निवसर स्थानकातून पुढे जाताना
पानवल दरीपुल
पानवल दरीपुल आणि टिके बोगदा
टिके बोगदा
पानवल दरीपुल
रो-रो सेवा पानवल पुलावरून
मडगाव स्थित कोच केयरिंग सेंटर
पानवल दरीपुल
रत्नागिरी रेलवे स्थानक
१२६१८ मंगला एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकात प्रवेश करताना
पानवल दरीपुलाचा सर्वात उंच पिलर
पानवल दरीपुल







